A11

Saturday, July 29, 2017

श्री क्षेत्र हरिहरेश्वर , श्रीवर्धन.



मूळ श्री क्षेत्र हरिहरेश्वरचे स्थान पुरातन असले तरी आजमितीस उभे असलेले मंदिर पेशवेकालीन आहे.
श्री काळभैरवाच्या मंदिरावरील लेखात तसा स्पष्ट उल्लेख आहे.इ.स.१७२३ मध्ये पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोधार केला तर जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी देवालयातून तीर्थावर जाणाऱ्या पायऱ्या बांधल्या.




त्यापूर्वी इ.स.१६७४ मध्ये छ.शिवाजी महाराजही येथे दर्शनासाठी येउन गेल्याची नोंद मिळते.इ.स.१८१८-२० पासून म्हणजे पेशवाईच्या अस्तापासून इ.स.१८४१ पर्यंत देवस्थानचा कारभार ब्रिटीश सरकार पाहत असे.
त्यानंतर इ.स.१८४२ पासून कमिटीचा कारभार सुरु झाला व २ मे १९५३ साली ट्रस्ट निर्माण होऊन आजअखेर विश्वस्तामार्फत कारभार पहिला जातो.


For more Information.
visit www.shrivardhankatta.com

जीवना बंदर, श्रीवर्धन .


श्रीवर्धन ते दिवेआगर या समुद्रकिनाऱ्याने जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ३ कि.मी अंतरावर समुद्राच्या दिशेला जीवना बंदर आहे.
तेथे कोळ्यांची धांदल चाललेली असते.त्यांची विणलेली जाळी,माशांचे प्रकार,बोटी व इतर साहित्याची निगराणी हे सगळे पाहत स्वताला हरून बसल्यासारख वाटते.


या ठिकाणच्या डोंगरावर एक जुनी बत्ती आहे.
मच्छिमारांसाठी त्याचा मार्गादार्षाकासारखा उपयोग होतो.
या टेकडीवरून अथांग सागराचे विहंगमय दृश दिसते.


For more Information.
visit www.shrivardhankatta.com


धज , दिवेआगर .



हा शिलालेख ग्रामपंचायती समोर,रस्त्याच्या कडेला,चौथऱ्यावर आहे.हा अरबी भाषेत आहे.
यामध्ये 'बुऱ्हाण निजामाशाहाचा' उल्लेख आहे.
हा शिलालेख असलेल्या जागेस 'धज'म्हणतात.
कदाचित ध्वज शब्दाचा तो अपभ्रंश असावा.


For more information
visit www.shrivardhankatta.com

दिवेआगर, श्रीवर्धन .


इसवी सनाच्या प्रारंभापासून सुमारे १४०० वर्षापर्यंत या गावाचा दीपक असा उल्लेख आढळतो.त्याकाळी ती एक समृद्ध नगरी होती.सातवाहन,मौर्य,राष्ट्रकूट,चालुक्य,शिलाहार,या राजघराण्यानी आपापल्या काळात येथे राज्य केले.
कोकण किनारपट्टीला सुमारे २००० वर्षापूर्वीचा ज्ञात इतिहास आहे.किनारपट्टीवरील विविध बंदरातून परदेशाशी त्या काळी जलमार्गे व्यापार चालत असे. 


आज उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक संदर्भावरून दिवेआगर गावाचा उल्लेख प्रथम शके ९७३ च्या सुमारास शिलाहार राजा छित्तराज याच्या राजवटीतील ताम्रपटात सापडतो.
या ताम्रपटास 'वेलासी आगार' ताम्रपट म्हणतात.
For more Information.
visit www.shrivardhankatta.com


कुसुमादेवी मंदिर, श्रीवर्धन .


श्रीवर्धन परिसरातील मंदिरामध्ये कुसुमादेवीचे मंदिर थोडे वेगळे ठरते कारण ते गावापासून थोडे लांब डोंगरच्या कुशीत आणि हिरव्यागर्द झाडीत लपलेले आहे.श्रीवर्धनपासून दिवेआगरच्या मरीन ड्राईव्हकडे वळून एक कि.मी.वर उजवीकडे कच्चा रस्ता लागतो.या कच्च्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दाट झाडी आहे.येथे आतमध्ये ३ कि.मी.मोटार वाहन जाऊ शकते.नंतर ५-१० मिनिटे चालावे लागते.थोड्या अंतराने हे प्राचीन स्थान आहे.


For more Information.
visit www.shrivardhankatta.com



सोमजाई मंदिर ,श्रीवर्धन .

श्रीवर्धनच्या मुख्य रस्त्यावर उजव्या बाजूस मोठे पटांगण दिसते. तेथेच थोडया उंचीवर सोमजाई मंदिर आहे.हे स्थान प्राचीन आहे असे मानतात.अगस्ती मुनींनी सोमजाईची स्थापना केली असे मानतात.सध्याचे मंदिर पेशव्यांनी जीर्णोद्धार केलेले आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारवरील कोरीव काम व आतील नक्षीदार लाकडी खांब तसेच गाभाऱ्यात देवापुढे लावण्यासाठी उंच पिटली समया आवर्जून पाहण्या सारख्या आहेत.सोमजाई देवी शाळीग्राम स्वरूपातील असून शीव,भवानी,नंदी,वासुकी,या चार शक्ती मिळून सोमजाई नावाने प्रसिद्ध आहेत.

For more Information.
visit www.shrivardhankatta.com


श्री राम मंन्दिर ,श्रीवर्धन.










1877 मध्ये या परिसरातील कोळींनी पुढाकार घेऊन राम मंदिर बांधले. त्याच्यामध्ये एक मोठा सभामंडप आणि पवित्र स्थान आहे. इथुन समुद्राचे भव्य दृश्य दिसते.

या पवित्र स्थानात राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या संगमरवरी पुतळ्याचे संगमरवरी दर्शन आहे. बाहेर बाजूला गणपती एक गरुड वर बसलेला आहे.

For More Information.
visit www.shrivardhankatta.com

लक्ष्मीनारायण मंदिर , श्रीवर्धन




शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून जाऊन पहावी अशी आहे.सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी.दगडाच्या झीलईमुले ती चकचकीत दिसते.अतिशय रेखीव प्रमाणबध्द असलेल्या या मूर्तीच्या उजव्या पायाशी विष्णुवाहन गरुड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे.या शिवाय जय-विजयही दोन्ही बाजूस उभे आहेत.विष्णूच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार (पद्य,चक्र,गदा,शंख) ही मूर्ती श्रीधरची ठरते.गळ्यातील दागिन्यांचे नक्षीकाम,मुकुट व प्रभावळीचे नक्षीकाम,आयुधांचे कोरीवकाम म्हणजे बारीक कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे.मध्यंतरीच्या काळात केव्हातरी ही मूर्ती भंग पावली परंतु तिचे शिल्पसौंदर्य तसूरभरही कमी झालेले नाही.

For More Information.
visit www.shrivardhankatta.com

श्री रूपनारायण मंदिर, दिवेआगर


भैरवनाथ मंदिरापुढे असलेल्या मुक्याच्या गल्लीतून आपण समुद्राकडे जाणाऱ्या आणखी एका रस्त्यापाशी येतो.या गल्लीतून पुढे गेल्यावर मुक्याच्या गल्लीतून आपण समुद्राकडे जाणाऱ्या आणखी एका रस्त्यापाशी येतो.या गल्लीतून पुढे गेल्यावर श्री रूपनारायण आणि श्री सुंदरनारायण मंदिरापाशी आपण पोहोचतो.मंदिराचे बांधकाम जीर्नोद्धारीत असून आतील हेमांडपंथी गाभारा मात्र प्राचीन आहे.गाभार्यातील भिंती चांगल्या दीड - दोन फूट रुंद असून आतमध्ये वाकून प्रवेश करावा लागतो.

For more information.
visit www.shrivardhankatta.com


हरिहरेश्वरचा समुद्र किनारा

हरिहरेश्वरचा समुद्र किनारा तसा कायम उसळताच असतो.खडकाळ भागामुळे पाण्याला ओढ जबरदस्त असते.तेंव्हा येथे केलेले समुद्रस्नान जर जपून आणि सावधतेनेच करायला हवे.हा मखमली वाळूचा किनारा स्वच आहे.या वाटेने पर्यटक येत नसल्याने किनार्यावर तशी गर्दी नसते.

see Video :
https://youtu.be/rW6K4ksmdpU

For More Information.
Visit www.shrivardhankatta.com




श्रीवर्धनचा समुद्र किनारा


सुमारे ३ कि.मी..लांबीचा,स्वच्छ ,सुरक्षित आणि शांत निवांत असा सागरतीर हे श्रीवर्धन चे खास आकर्षण.
मऊशार वाळूवर चालताना पावलांना होणाऱ्या गुदगुदल्या ,
मधूनच पायापर्यंत येणारी एखादी अवखळ लाट आणि पश्चिमेचा भन्नाट वारा अंगावर येत किनाऱ्यावर घेतलेला अनुभव.


Watch Video :






For more information
Visit www.shrivardhankatta.com





श्रीवर्धन पेशवे मंदिर

सोमजाई मंदिरापासून थोडे पुढे गेले कि पुढच्या चौकात डावीकडे वळून आत गेल्यावर आपल्याला छोटेखानी बुरुज,प्रवेशद्वार,नगारखाना,असे अलीकडील काळात केलेले बांधकाम दिसते.तेथेच आतमध्ये पेशवे मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोठे प्रांगण आहे.याच ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १६६० मध्ये झाला.आज तेथे असलेली इमारत नवीन असली तरीही त्याचे जुने जोते ही पेशव्यांच्या पूर्वीच्या वाड्याची खरीखुरी निशाणी आहे.या इमारती समोर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.पेशवाई पगडी ,पेशवाई वस्त्र घातलेल्या हातात तलवार असलेला हा पुतळा आहे.१९८८ साली बांधलेल्या या स्मारकास सुधारणेस पुष्कळ वाव आहे.

For more information.
visit www.shrivardhankatta.com