A11

Thursday, September 21, 2017

श्रीवर्धन मधील पहिली मराठी वेबसाईट : श्रीवर्धन कट्टा


पूर्वी कोंकण म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादी नावे घेतली जायची पण आजकाल ही परिभाषा बदलली आहे. त्यामध्ये  श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेगर हि नावे सुद्धा घेतली जातात .

श्रीवर्धनकट्टा वेबसाईटचा या प्रक्रियेत बदल करण्यात  महत्त्वाची भूमिका आहे.

"A new startup started as a project for college and then turns into a business by 4 localities who used to stay
in shrivardhan."

ही  वेबसाईट 2012 मध्ये सुरु झाली आणि मुख्य उद्दिष्ट होते त्यांच्या स्थानिक जागांचे संपूर्ण आणि एकमेव पर्यटन विकास .

त्यांनी स्वत: ची वेबसाइट तयार केली, जोडलेली सामुग्री, व्हिडिओ आणि फोटो स्वतःच गोळा केले . ते फक्त मोबाईल फोनसह सुरु केले आता त्यांच्याकडे डीएसएलआर आणि व्हिडिओ कॅमेरा सेट आहे.

वेबसाइटचे नाव श्रीवर्धनकट्टा मूलत: फेसबुकवर असलेल्या एका ग्रुपकडून आले आहे ज्याची स्थापना त्यांच्यापैकी एकाद्वारे केली आहे .

अगदी थोडं थोडं थोडं ते प्रसिद्ध बनले. आता वेबसाइटवर ५५,९५५  पेक्षा जास्त दर्शक संख्या आणि बरेच अधिक फीडबॅक आणि शेअर्स आहेत.

गेली ५  वर्षे वेबसाइट वेगाने वाढत आहे.नंतर खूप नवीन वेबसाईट आल्या पण श्रीवर्धनकट्टा एवढे कोकण पर्यटकातील बरेचसे  हिस्सा कोणी  मिळवू शकला नाही

इंटेल कॉर्प (बंगलोर) संबंधित Shrivardhan Guideअॅन्ड्रॉइड अॅप सुद्धा उपलब्ध आहे .
जो आपल्या गंतव्यस्थानी मार्गदर्शक म्हणून तसेच ऑफलाइन कार्य करेल.

Website blog link : http://shrivardhankatta.blogspot.in/

Facebook Page : http://www.facebook.com/shrivardhankatta/
source : http://sdntourism.blogspot.in/

Website : www.shrivardhankatta.com

"आवडल्यास नक्की शेअर करा."

Saturday, August 05, 2017

Shrivardhan Beach


Enjoy the cinematic view of Shrivardhan Beach.

https://youtu.be/2qDXlqSO83U

"SHARE IF YOU LIKE IT"

Saturday, July 29, 2017

श्री क्षेत्र हरिहरेश्वर , श्रीवर्धन.



मूळ श्री क्षेत्र हरिहरेश्वरचे स्थान पुरातन असले तरी आजमितीस उभे असलेले मंदिर पेशवेकालीन आहे.
श्री काळभैरवाच्या मंदिरावरील लेखात तसा स्पष्ट उल्लेख आहे.इ.स.१७२३ मध्ये पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोधार केला तर जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी देवालयातून तीर्थावर जाणाऱ्या पायऱ्या बांधल्या.




त्यापूर्वी इ.स.१६७४ मध्ये छ.शिवाजी महाराजही येथे दर्शनासाठी येउन गेल्याची नोंद मिळते.इ.स.१८१८-२० पासून म्हणजे पेशवाईच्या अस्तापासून इ.स.१८४१ पर्यंत देवस्थानचा कारभार ब्रिटीश सरकार पाहत असे.
त्यानंतर इ.स.१८४२ पासून कमिटीचा कारभार सुरु झाला व २ मे १९५३ साली ट्रस्ट निर्माण होऊन आजअखेर विश्वस्तामार्फत कारभार पहिला जातो.


For more Information.
visit www.shrivardhankatta.com

जीवना बंदर, श्रीवर्धन .


श्रीवर्धन ते दिवेआगर या समुद्रकिनाऱ्याने जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ३ कि.मी अंतरावर समुद्राच्या दिशेला जीवना बंदर आहे.
तेथे कोळ्यांची धांदल चाललेली असते.त्यांची विणलेली जाळी,माशांचे प्रकार,बोटी व इतर साहित्याची निगराणी हे सगळे पाहत स्वताला हरून बसल्यासारख वाटते.


या ठिकाणच्या डोंगरावर एक जुनी बत्ती आहे.
मच्छिमारांसाठी त्याचा मार्गादार्षाकासारखा उपयोग होतो.
या टेकडीवरून अथांग सागराचे विहंगमय दृश दिसते.


For more Information.
visit www.shrivardhankatta.com


धज , दिवेआगर .



हा शिलालेख ग्रामपंचायती समोर,रस्त्याच्या कडेला,चौथऱ्यावर आहे.हा अरबी भाषेत आहे.
यामध्ये 'बुऱ्हाण निजामाशाहाचा' उल्लेख आहे.
हा शिलालेख असलेल्या जागेस 'धज'म्हणतात.
कदाचित ध्वज शब्दाचा तो अपभ्रंश असावा.


For more information
visit www.shrivardhankatta.com

दिवेआगर, श्रीवर्धन .


इसवी सनाच्या प्रारंभापासून सुमारे १४०० वर्षापर्यंत या गावाचा दीपक असा उल्लेख आढळतो.त्याकाळी ती एक समृद्ध नगरी होती.सातवाहन,मौर्य,राष्ट्रकूट,चालुक्य,शिलाहार,या राजघराण्यानी आपापल्या काळात येथे राज्य केले.
कोकण किनारपट्टीला सुमारे २००० वर्षापूर्वीचा ज्ञात इतिहास आहे.किनारपट्टीवरील विविध बंदरातून परदेशाशी त्या काळी जलमार्गे व्यापार चालत असे. 


आज उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक संदर्भावरून दिवेआगर गावाचा उल्लेख प्रथम शके ९७३ च्या सुमारास शिलाहार राजा छित्तराज याच्या राजवटीतील ताम्रपटात सापडतो.
या ताम्रपटास 'वेलासी आगार' ताम्रपट म्हणतात.
For more Information.
visit www.shrivardhankatta.com