A11

Saturday, July 29, 2017

लक्ष्मीनारायण मंदिर , श्रीवर्धन




शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेली विष्णुमूर्ती आवर्जून जाऊन पहावी अशी आहे.सुमारे दोन फूट उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची असून शिलाहार काळातील असावी.दगडाच्या झीलईमुले ती चकचकीत दिसते.अतिशय रेखीव प्रमाणबध्द असलेल्या या मूर्तीच्या उजव्या पायाशी विष्णुवाहन गरुड व डाव्या पायाशी लक्ष्मी आहे.या शिवाय जय-विजयही दोन्ही बाजूस उभे आहेत.विष्णूच्या हातातील आयुधांच्या क्रमानुसार (पद्य,चक्र,गदा,शंख) ही मूर्ती श्रीधरची ठरते.गळ्यातील दागिन्यांचे नक्षीकाम,मुकुट व प्रभावळीचे नक्षीकाम,आयुधांचे कोरीवकाम म्हणजे बारीक कलाकुसरीचा आदर्श नमुना आहे.मध्यंतरीच्या काळात केव्हातरी ही मूर्ती भंग पावली परंतु तिचे शिल्पसौंदर्य तसूरभरही कमी झालेले नाही.

For More Information.
visit www.shrivardhankatta.com

No comments:

Post a Comment