Saturday, July 29, 2017

श्री क्षेत्र हरिहरेश्वर , श्रीवर्धन.



मूळ श्री क्षेत्र हरिहरेश्वरचे स्थान पुरातन असले तरी आजमितीस उभे असलेले मंदिर पेशवेकालीन आहे.
श्री काळभैरवाच्या मंदिरावरील लेखात तसा स्पष्ट उल्लेख आहे.इ.स.१७२३ मध्ये पेशव्यांनी या मंदिराचा जिर्णोधार केला तर जावळीच्या चंद्रराव मोरे यांनी देवालयातून तीर्थावर जाणाऱ्या पायऱ्या बांधल्या.




त्यापूर्वी इ.स.१६७४ मध्ये छ.शिवाजी महाराजही येथे दर्शनासाठी येउन गेल्याची नोंद मिळते.इ.स.१८१८-२० पासून म्हणजे पेशवाईच्या अस्तापासून इ.स.१८४१ पर्यंत देवस्थानचा कारभार ब्रिटीश सरकार पाहत असे.
त्यानंतर इ.स.१८४२ पासून कमिटीचा कारभार सुरु झाला व २ मे १९५३ साली ट्रस्ट निर्माण होऊन आजअखेर विश्वस्तामार्फत कारभार पहिला जातो.


For more Information.
visit www.shrivardhankatta.com

No comments:

Post a Comment