A11

Saturday, July 29, 2017

श्रीवर्धन पेशवे मंदिर

सोमजाई मंदिरापासून थोडे पुढे गेले कि पुढच्या चौकात डावीकडे वळून आत गेल्यावर आपल्याला छोटेखानी बुरुज,प्रवेशद्वार,नगारखाना,असे अलीकडील काळात केलेले बांधकाम दिसते.तेथेच आतमध्ये पेशवे मंदिर आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोठे प्रांगण आहे.याच ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १६६० मध्ये झाला.आज तेथे असलेली इमारत नवीन असली तरीही त्याचे जुने जोते ही पेशव्यांच्या पूर्वीच्या वाड्याची खरीखुरी निशाणी आहे.या इमारती समोर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.पेशवाई पगडी ,पेशवाई वस्त्र घातलेल्या हातात तलवार असलेला हा पुतळा आहे.१९८८ साली बांधलेल्या या स्मारकास सुधारणेस पुष्कळ वाव आहे.

For more information.
visit www.shrivardhankatta.com


No comments:

Post a Comment